Browse Categories
विचारकिरण - खंड १ ते १०

Price : Rs. 12,630.00

Quick Overview

Availability: In Stock: 10

महात्मा फुले त्यांच्या वैचारिक वारसदारांमध्ये अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या मुकुंदराव पाटलांनी सलग ५७ वर्षे दीनमित्र हे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक विश्वाला हादरे देणारे साप्ताहिक चालविले. त्यातील अग्रलेख म्हणजे महाराष्ट्राच्या जडणघडणीचे साक्षिदार. हे अग्रलेख वाचल्याशिवाय आधुनिक भारताचा, विशेष करून महाराष्ट्राचा, इतिहास समजावून घेता येत नाही. विविध विषयांवर आणि प्रश्नांवर त्यांनी केलेले सडेतोड आणि निष्पक्ष लेखन आजही महाराष्ट्राला अनेक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पैलूंसंबंधी मोलाचे मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य बाळगून आहे. अशा या अग्रलेखांचे संपादन महाराष्ट्रातील ११ नामवंत अभ्यासकांनी करून हा दशखंडी बृहद्प्रकल्प साकार केला आहे. या बृहद्प्रकल्पाची विस्तृत प्रस्तावना लिहिली आहे सुप्रसिद्ध विचारवंत आणि साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी. कर्मवीर भाऊराव पाटील, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. के क्षीरसागर, वि. द. घाटे त्यांच्यासारखा नामवंतांचे या अग्रलेखासंबंधीचे लेख देखील यात समाविष्ट आहेत. साहित्य आणि मानव्यविद्यांच्या प्राध्यापक विद्यार्थ्यांसाठी, सर्व विचारी वाचकांसाठी, नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी, सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी हे ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहेत.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.